बीड | युती करायची असेल तर लवकर करून टाका, नाहीतर आमचे उमेदवार तयार आहेत’ असा थेट इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. खरंतर युती होणार हे 100 टक्के असलं तरी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरला नाही आहे. त्यामुळे उमेदवारांची नावं आणि कोणते मतदार संघ कोणाच्या पारड्यात असा संभ्रम आहे.
खैरे बीडमधील शिवसेनेच्या कार्यकता मेळाव्यात बोलत होते. यावेळी रोहयो मंत्री जयदत्त क्षिरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षिरसागर, हे उपस्थित होते.
शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा असल्यामुळे एकदा काय तो युतीचा निर्णय घ्या नाहीतर आमचे उमेदवार स्वबळावर लढणार असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.
‘उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आदित्य साहेबांच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे युती करायची तर लवकर करा. मात्र, युतीमधील शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा करू नका. आम्ही भाजपाच्या जागेच्या विरोधात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा करणार नाही. पण युती करायची नसेल तर बीडच्या 6 जागांवर माझे उमेदवार तयार आहेत. त्यांनी युती तोडली तर आम्ही तयार आहोत’ असा सूचक इशारा चंद्रकांत खैरे यांनी भाजपाला दिला आहे.
माझ्या लोकसभा निवडणुकीत कोणी झपका दिला माहित आहे. दगाबाजीचा फटका बसला आहे, असं खैरे म्हणाले. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत खैरे यांनी वज्रमुठ आवळून कामाला लागण्याचे आदेश देखील यावेळी दिले.
महत्वाच्या बातम्या-
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग चिदंबरम यांना भेटायला तिहार तुरूंगात! https://t.co/HPxHXfE4Iq
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
दहशतवादाविरोधात लढताना डोनाल्ड ट्रम्पही मजबुतीने आपल्यासोबत- नरेंद्र मोदी – https://t.co/45CziLfONB @narendramodi @realDonaldTrump
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
मराठमोळा पैलवान राहुल आवारेचा जागतिक पातळीवर डंका; घातली कांस्यपदकाला गवसणीhttps://t.co/dNLtvbm4qA @rahulbaware1
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019