“नाना मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला”, चंद्रकांत पाटलांचा सज्जड दम

मुंबई | पंजाब (Panjab) दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (Narendra modi) दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करावा लागला आहे. आता त्यावरुन केंद्र आणि पंजाबमधील संबंध ताणले आहेत.

पंजाबच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचं ठरलं. मात्र, त्याचवेळी पंतप्रधान मोदींचा ताफा काही शेतकऱ्यांनी अडवला. त्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे.

मोदींच्या सुरक्षेवरून भाजप आणि काँग्रेसमधील नेते एकमेकांवर टीका-टीप्पणी करत आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं होतं. त्यांनी मोदींवर टीका केली होती.

ठरवून दिलेल्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या रस्त्याने जायचं आणि आपणच कांगावा करायचा हे पंतप्रधानांना शोभत नाही. त्यांच्या पंतप्रधानांच्या पदाला शोभत नाही, असं नाना पटोले म्हणाले.

शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. त्याचा परिणाम आज पंजाबमध्ये पाहायला मिळाला. जे पेरलं तेच उगवणार, असा टोला नाना पटोले यांनी मोदींना लगावला होता. त्यावरून आता चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची तूलना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी करणं हास्यास्पद आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रसला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोदींचा ताफा अडवला अन् ‘फुलराणी’ भडकली, म्हणाली…

पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक, पंजाबमधील रॅली रद्द; भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका

चारचौघांमध्ये राडा!, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भांडणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद

हात लावायचा नाय मला! महाविकास आघाडीतील आजी-माजी आमदार भिडले!