नागपूर महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

नागपूर |  राजकारणात नेते आपापल्या राजकीय महत्वकांक्षा ठेवत असतात. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची देखील मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही. शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री होण्याची संधी पक्षाने दिली तर सोडणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे निवडून आलेले आमदार आणि केंद्रिय नेतृत्व ठरवत असतं. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद राहिले तर मीच पुन्हा मुख्यमंत्री होईल, असं फडणवीस म्हणाले.

चंद्रकांत पाटील राज्याचे दोन नंबरचे मंत्री… त्यांना पत्रकार सतत मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारत असतात. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही, असं तेही सांगत असतात. शुक्रवारी त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ‘नाही…’ असंच उत्तर दिलं. पण कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी पुन्हा त्यांना याच विषयावर छेडले असता ‘मग सोडतो का काय??’, असं उत्तर दिलं.

नागपूरमधल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता चंद्रकांत दादा काय बोलले मला माहित नाही. त्यांच्याशी माझं आज सकाळी बोलणं झालं नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

चंद्रकांत पाटील माझे चांगले सहकारी सहकारी आहेत. आत्ताच त्यांनी राज्याचे नेतृत्व हाती घेतले आहे. त्यांना चांगले काम करू द्या, असं ते म्हणाले.

भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे. जनाधार असलेल्या लोकांची पक्षाला गरज असते. म्हणून येणाऱ्या काळात जनाधार असलेल्या लोकांना पक्षात घेतले जाईल, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-विधानसभेसाठी पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंनी खास प्लॅन आखला! यशस्वी होणार??

-भाजपची महाभरती बंद नाही… चांगल्या लोकांचे स्वागत आहे- देवेंद्र फडणवीस

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!

-मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का?? चंद्रकांत पाटलांच्या उत्तराने उपस्थित अवाक

-ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…

IMPIMP