“मुस्लिमांची दाढी कुरवाळणारी शिवसेना औरंगाबादचं संरक्षण करेल काय?”

मुंबई| शिवसेनेनं मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसायचं ठरवलय, घटनेमध्ये नसताना मुसलमानांना 5 टक्के आरक्षण देवून मुसलमानांच्या दाढीला हात लावण्याचा प्रयत्न केला. ज्या सीएएमध्ये कुठेही मुसलमानांना धोका नसताना सीएए ची अंमलबजावणी करणार नाही का तर मुसलमानानांना खुश करता येतं, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मुसलमानांचं लांगुनचालन करणारी शिवसेना संभाजीनगरचं रक्षण करेल काय असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला ते औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. त्याला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाहीत त्यामुळे औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ झालंच पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मित्र असावा तर तो अमोल कोल्हेंसारखा- धनंजय मुंडे

-“फक्त आणि फक्त पत्नीमुळं देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढत आहेत”

-शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना काहीही अडचण येऊ देऊ नका- मुख्यमंत्री

-तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांना दाखवला कायद्याचा धाक; वकिलामार्फत धाडली नोटीस

-‘अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा असतील अशा पक्षात राहू शकत नाही’; भाजप महिला नेत्याचा राजीनामा