उद्धव ठाकरेंच्या ‘आमचं ठरलंय’ म्हणण्यानंतर सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई |  पक्षासाठी अधिक जागा मागणे हे माझे काम आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘आमचं ठरलंय’ म्हणण्यानंतरही पुन्हा एकदा जागावाटपावर भाष्य केलं आहे. त्यामुळे नक्की भाजप आणि शिवसेनेचं ठरलंय का? आणि ठरलंय तर ते चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्ष म्हणून माहिती कसं नाही? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. जागावाटपावर दोन्ही पक्षांकडून विधाने करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे युती होणार असं ठासून सांगत आहे.

युतीच्या मनोमिलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही. लोकसभेवेळीच युतीच्या विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बुधवारी टोला लगावला होता. त्यानंतर पाटलांनी आज पुन्हा एकदा जागावाटपावर भाष्य केलं आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी शिवसेनेला फॉर्म्युला सांगितल्यानंतर बाकीच्यांच्या चर्चांना अर्थ नाही, असा टोला देखील उद्धव यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-