पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का?? चंद्रकांत पाटलांच्या उत्तराने उपस्थित अवाक

पुणे |  चंद्रकांत पाटील राज्याचे दोन नंबरचे मंत्री… त्यांना पत्रकार सतत मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न विचारत असतात. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही, असं तेही सांगत असतात. आजही त्यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ‘नाही…’ असंच उत्तर दिलं. पण कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी पुन्हा त्यांना याच विषयावर छेडले असता ‘मग सोडतो का काय??’, असं मिश्किल उत्तर दिलं. या उत्तराने उपस्थित देखील अवाक झाले.

शरद पवारांनी आणखी मानसिक धक्क्यांची तयारी करावी, असा इशारा देत पाटील यांनी राष्ट्रवादीतून बरेच मोठे नेते लवकरच भाजपवासी होणार असल्याचं सूतोवाच केलं आहे.

बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला  40 टक्के मतदारांनी शरद पवार यांना नाकारलं आहे. तेव्हा विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप-शिवसेनेत होणारी आवक चांगलीच वाढली आहे. यामुळे आघाडीला घडीघडीला मोठमोठे धक्के बसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाटलांचं हे वक्तव्य राष्ट्रवादीची धकधक वाढवणारं आहे.

सत्तेत असताना शरद पवारांनी छगन भुजबळ आणि गणेश नाईकांना ईडीची भिती दाखवून राष्ट्रवादीत आणलं का? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

-अमित शहांनी केला उदयनराजेंना फोन आणि म्हणाले…..

-ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…

-“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”

-शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!

-मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे

IMPIMP