काँग्रेसमुळे कोल्हापूरमध्ये महापूर- चंद्रकांत पाटील

पुणे |  अलमट्टी धरणाची वाढलेली उंची, 2005 मध्ये निश्चित केलेली पूररेषा, मधल्या काळात झालेली बांधकामं त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. आणि त्यांच्या या ध्येय धोरणामुळेच कोल्हापूरमध्ये महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

पूररेषा बदलण्यासाठी आलेल्या प्रस्तावानुसार किमान 1 हजार हेक्टर जमिनीचा विकास करता येतो. नदीची पुररेषेचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली होती. परंतू त्याअगोदरच ही घटना घडली, असं पाटील म्हणाले.

हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता परंतू तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडेल किंवा नेमका किती पडेल याचा अंदाज आला नव्हता, असंही ते म्हणाले.

कोणत्याही धरणात 70 टक्के पाणी जमा झाल्यावर पाणी सोडावे असा कायदा करण्याच्या आम्ही विचाराधीन आहोत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

मराठवाड्यात कायमचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 10 हजार कोटींचा प्रकल्प केला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, अंबाबाईच्या कृपा अजून आमच्यावर झाली नसल्याने कोल्हापूरात आमची सत्ता आलेली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-