महाराष्ट्र मुंबई

रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना कोण-कोण भेटतं; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्या ज्या आमदारांना आपल्या भवितव्याची चिंता पडली आहे, ते स्वतःहून येऊन रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांची एवढीच जर पक्षावर पकड आहे तर त्यांनी अशा रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्या आमदारांना थांबवावं, असं आव्हान देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक विद्यमान आमदार येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी नुकताच सोलापुरात केला होता. त्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी सुरु आहेत.

काँग्रेसचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर-

रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांचे असले धंदे चालतात का?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे शोभत नाही. साऱ्या देशात भाजपकडून साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर चालू आहे, असंही ते म्हणाले.

रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांकडे काय चाललंय याकडे चंद्रकांत पाटील डोळे लावून बसतात का? हा प्रश्न उपस्थित होतोय, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

राष्ट्रवादीकडूनही चंद्रकांत पाटलांचा समाचार- 

चंद्रकांत पाटील जसे अजित पवारांना भेट होते, तसे इतरजण करत आहेत, असं त्यांना वाटत आहे. आपण अजित पवारांना किती वेळा भेटलो? हे चंद्रकांत पाटलांनी सांगावं, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

आता यांची आघाडी झाली की भाजप शिवसेनेचे अनेकजण आमच्याकडे येण्याची तयारी दाखवत आहे. आम्हाला अनेक जणांचे मेसेज येत आहेत, असंही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘बीव्हीजी’चे मालक हणमंतराव गायकवाडांना 16 कोटी रुपयांना फसवलं

-काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर; हे 13 दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर

-…तर या दिवशी प्रकाश आंबेडकर, अजित पवार आणि राज ठाकरे एकाच मंचावर?

-हरितपट्ट्यात राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांचंच बेकायदा बांधकाम???

-भावाविरोधात कारवाई केल्याने मायावती भडकल्या; म्हणतात…

IMPIMP