पुणे | पुणे महापालिका निवडणूक पुन्हा जिंकण्यासाठी एकीकडे भाजप जोर लावत आहे. भाजपडून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे अनेक बडे नेते मैदानात उतरले आहेत. तर दुरीकडे राष्ट्रवादी पुणे पुन्हा काबीज करण्यासाठी जोर लावत आहे.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
पुणे महापालिका निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतील पण राजकारणात एका रात्रीत काहीही होऊ शकतं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी खळबळ उडवून दिली आहे.
किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, पुण्यात किमान 200 ठिकाणी निदर्शने व्हायला हवी होती पण पुण्यातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेशिवाय भाजप माहीतच नाही. आपण केवळ नगरसेवक म्हणून केवळ काम करण्यासाठी जन्माला आलो नाही आपण राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
पुढच्या नेत्यावर होणारा हल्ला थांबवायचा असेल, तर आपल्यालाही ‘रिअॅक्ट’ व्हावे लागेल. ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल, असं ते म्हणालेत.
महापालिकेतील आपल्या सत्ताकाळात भाजपने उत्तम काम केलं आहे. या कामाचा अहवाल घराघरापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो”
अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे
…म्हणून लोक भाजपला मतदान करतात- पृथ्वीराज चव्हाण
“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात”
“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”