‘ठाकरे सरकार गेंड्यापेक्षा जास्त असंवेदनशील’;चंद्रकांत पाटील संतापले

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने शनिवारी नवी नियमावली जाहीर केली.

राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर करत राज्यभर निर्बंध अधिक कठोर केले आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेला आहे. कधी शाळा सुरू करतात, कधी बंद करतात, कधी परीक्षा ऑनलाईन तर कधी ऑफलाईन. राज्य सरकारकडून सत्यानाश चालला आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला फटकारलं आहे.

सर्वजण एकत्र बसून नियमावली तयार करा. वडेट्टीवार चंद्रपुरात वेगळं बोलणार, टोपे जालन्यात वेगळं बोलणार, अजित पवार वेगळंच बोलणार. रोज नवीन घोषणा करण्यापेक्षा एकच काय ते ठरवा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

लोकांना घाबरवू नका, तज्ज्ञांना विचारा, त्यांना बोलू द्या. हे सरकार गेंड्यापेक्षाही जास्त असंवेदनशील झालंय, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला आहे.

राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसं होत नाहीये. विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं असतं. राज्यात केवळ मनमानी कारभार चाललाय, असा आरोप देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

किमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तरी बैठकीला बोलवायचं. ते शासकीयदृष्ट्या शासनाचा भाग आहेत, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

रात्रीचे उद्योग करणाऱ्यांवर तुम्ही निर्बंध आणताय, आणायचे असतील तर दिवसा चालणाऱ्या उद्योगांवरही आणा, अशी टीका देखील चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

दरम्यान, आता जास्त निर्बंध आणून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे. त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये, असा सल्ला देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“किरीट सोमय्यांना म्हैस दूध देतेय हे दिसतच नाही, ते नेहमी शेणंच पाहतात”

ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘या’ पठठ्याने एका बॉलमध्ये काढले चक्क 7 रन, पाहा व्हिडीओ

“ठाकरे सरकारचं गांजावर गजब प्रेम आहे”

एसटी बसचा चक्काचूर!, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

बाहुबली फेम कट्टपालाही झाली कोरोनाची लागण, अभिनेते सत्यराज रूग्णालयात दाखल