पुणे महाराष्ट्र

“मोठं होण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांवर टीका सुरु”

पुणे : शरद पवार साहेबांवर टीका करुन चंद्रकात पाटील हे राजकारणात मोठं होण्याचा बालिशपणा करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित  कार्यक्रमात सोमवारी ते बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हा माणूस मोठा होत नाही. हा राज्याचा इतिहास आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

राज्याचे महसूलमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्याला लोकसभेपासून लक्ष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत ते बारामतीत तळ ठोकून होते. आता विधानसभेलाही त्यांनी बारामतीवर लक्ष्य केलं आहे, असा आरोपही धनंजय मुंडेंनी केला आहे. 

आठवड्यातून एकदातरी ते बारामतीत असतातच. नेहमीच पवारांवर विशेषत: शरद पवारांवर टीका करत असतात. चंद्रकांत पाटील शरद पवारांवर टीक करुन ते राजकारणात मोठा होण्याचा बालिशपणा करत आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीसह काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला होता. धनंजय मुंडेंनी त्याचाही समाचार घेतला. त्यांचं त्यांनाच माहित. मात्र त्यांच कोण आमच्या संपर्कात आहे हे आम्हाला माहित आहे, असंही मुंडे म्हणाले आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

“मोदीजी तुमचं आणि ट्रम्पचं काय बोलणं झालं हे तुम्ही देशाला सांगावं”

-मला तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती- नुसरत जहाँ

-…म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!

-“ट्रम्प खोटं बोलले; काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितलीच नाही”

-आधी कमलनाथांनी आणि आता रेड्डींनी फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न’!; स्थानिकांना 75 टक्के नोकऱ्या

IMPIMP