ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा- चंद्रकांत पाटील

मुंबई : ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत आणि तरीदेखील त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असं पाटील म्हणाले आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानानुसार हा शपथविधी बेकायदा आहे. सभागृहाचे सदस्य नसले तरी शपथ घेण्याची मुभा ही मंत्र्यांसाठी आहे मुख्यमंत्र्यासाठी नाही, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

शपथ घेताना मंत्र्यांनी आपल्या नेत्यांची नावे घेतली ते बेकायदेशीर आहे. कायद्याप्रमाणे शपथ घेताना अशी नावे घेता येत नाहीत. त्यामुळे हा शपथविधी रद्द करावा. सरकारला नियमबाह्य काम करु देणार नाही, अशा मागणीचं पत्र भाजपनं राज्यपालांना दिलं आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभेत आज दुपारी 2 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडे 170 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-