पुणे महाराष्ट्र

काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार- चंद्रकांत पाटील

पुणे :  काँग्रेस हा पक्ष नाहीये. काँग्रेस ही एक संस्कृती आहे. काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार… आपल्याला हीच संस्कृती संपवायची आहे. आणि आपली संस्कृती आणायची आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

आपली संस्कृती शिवाजी महाराज, टिळक आणि हेडगेवारांची आहे. आणि हीच संस्कृती पुढे न्यायची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ करून ‘अब की बार 220 पार’ हा नारा आपल्याला सत्यात आणायचा आहे, असं ते म्हणाले.

भविष्यात काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हे आपले धोरण आहे. त्याच दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा आदेशही त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, तोंडावर विधानसभा निवडणूक आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागा. ग्राऊंड लेवलवर जाऊन काम करा. गाफील राहू नका, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जागवला.

-महत्वाच्या बातम्या-

पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता?- राज ठाकरे

अजित पवारांच्या वाढदिवशी बारामतीत ‘मुर्दाबाद’च्या घोषणा! पाहा व्हीडिओ-

-उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधान झालेलं पाहायचंय- तानाजी सावंत

-पाकिस्तानला निघून जावं; ‘हा’ अभिनेता आझम खानवर भडकला

-राणेसाहेब… पराभवाची हॅट्रीक चुकवायची असेल तर निवडणूक लढवू नका; शिवसेनेचा सल्ला

IMPIMP