पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर |  महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं वक्तव्य  करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल केला आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.

महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना आम्ही गेल्या 5 वर्षात आम्ही हात लावू शकलो नाही. कारण आम्हाला सरकार सुरळीत चालवायचे होते. मात्र आता राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे. 250 जागा आम्ही जिंकणार आहोत, असं पाटील म्हणाले.

महाराष्ट्र लुटणाऱ्यांचा आता हिशेब चुकता करण्याची वेळ आली आहे. कारण त्यांनी सर्वसामान्यांच्या पैशाला हात लावला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात गेल्या 60 वर्षांत 250 घराण्यांनी सत्ता गाजवली. त्यांनी अक्षरश: महाराष्ट्र लुटून खाल्ला, त्यांची आता खैर नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, ज्यांनी महाराष्ट्र लूटला त्यांची चौकशी होणार आणि दोषींना तुरूंगात टाकणार, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-‘बाजी पलटने में देर नही लगती…’; धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल

-“शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा”

-“फडणवीस साहेब, भाजपची मेगाभरती थांबली असेल तर बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा”

-भाजपसाठी मोकळ रान; काँग्रेस-जेडीएसचे 14 बंडखोर आमदार अपात्र घोषित

-भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करा; उगीच सहानभूती मिळवू नका- चंद्रकांत पाटी

IMPIMP