भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं; चंद्रकांतदादांचा निशाणा

कोल्हापूर |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजप नेते गेल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवारांना घराबाहेर पडावं वाटलं. त्याअगोदर ते घरात बसून होते. त्यावेळी त्यांना घराच्या बाहेर पडावंसं वाटलं नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या घरांची, शेतीची पाहणी करण्यासाठी पहिल्यांदा भाजप नेते पोहचले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा केला आणि आता शरद पवार करायला निघाले आहेत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि पवारांना लक्ष्य केलं.

कालपासून कोकणाशी संबंधित भाजपचे सर्व आमदार काम करत आहेत. ते रत्नागिरी, रायगड या भागात प्रवास करत आहेत. केवळ प्रवास करुन आम्ही थांबलो नाही, तर आज 16 ट्रक साहित्य कोकणात पाठवले आहे. यात पत्रे ताडपत्री यांचा समावेश आहे. तेथील सर्व छपरं उडाली आहेत, असं सांगत या सरकारला नुकसानीचा अंदाज आला नाही, असा टोमणाही त्यांनी मारला.

या नुकसान भरपाईत एकरी किंवा हेक्टरी नुकसान भरपाई देऊन चालणार नाही. ती प्रति झाड द्यावी लागेल. कारण त्या प्रत्येक झाडाचं 10 वर्षांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे 100 कोटी किंवा 200 कोटी ही तुटपुंजी रक्कम आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत. विरोधी पक्ष काहीही बोलतो असं नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात आज 166 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती नव्या रूग्णांची झालीये नोंद…

-शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे

-वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, प्रकाश आंबेडकर यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी

-लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचं सरकारकडे कसलंच नियोजन नाही- राजू पाटील

-…त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना पैसा द्यावाच लागणार; चिदंबरम यांचा मोदी सरकारवर निशाणा