मुंबई | राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून जोरदार संघर्ष निर्माण होताना दिसत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत असल्यानं आता ठाकरे सरकार देखील भाजप सरकारच्या काळातील व्यवहारांची तपासणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे सरकार तपास करणार म्हटल्यावर राज्यात राजकारण पेटलं आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
मुख्यमंत्री जुन्या काळातील फाईली बाहेर काढून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. भाजप-शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, त्यांना जे करायचं ते करू द्या, असा पलटवार पाटील यांनी केला आहे. पाटील हे फडणवीस सरकारमध्ये महसुल मंत्री होते.
गेल्या 28 महिन्यात आम्हाला अनेक धमक्या आल्या. जयंत पाटील यांनी सहकाऱ्यांना फाईली काढण्याच्या सुचना दिल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
पाटील यांच्या जिल्ह्यात म्हणजेच कोल्हापूरमध्ये सध्या विधानसभेची पोटनिवडणुक होत आहे. भाजप-महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.
कोल्हापूरात बंटी पाटील यांनी शिवसेना संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यात वर्चस्वाची लढाई चालली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात भाषण करताना भाजपवर टीका केली आहे. या टीकेदरम्यानच त्यांनी भाजप काळात काही गडबड झाल्याचं म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत
“कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”
देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…
“दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”
पुतिन यांना सर्वात मोठा झटका; युद्धामुळे लेकीचा…