“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?”

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पुण्यातील मेट्रोचा पाहणी दौरा आयोजित केला. मेट्रोची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

पाटील यांनी महामेट्रोवर हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने खुलासा देत शरद पवार केवळ मेट्रो प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आले होते असं सांगितलं होतं.

शरद पवार यांच्याबद्दल आक्षेप नाही, मात्र पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पुणे पिंपरीतल्या आमदार-खासदाराला न कळवता, माननीय शरद पवारांच्या उपस्थितीत मेट्रोची ट्रायल केली गेली. पवारांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. ते राज्यसभा सदस्यही आहेत. पण अशा प्रकारे घाईत ट्रायल घेण्याचं काय कारण? यातून श्रेयवादाची लढाई चाललीय का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

रद पवार यांच्या मेट्रो प्रवासाबाबत महामेट्रोचा खुलासा वाचून हसूच आलं. पवारसाहेबांना माहिती घेण्यासाठी स्वतः मेट्रो स्टेशनला जावं लागलं? बरं, तेही मान्य, पण मेट्रोप्रवासाचं काय? एक चक्कर मारून आणा असा हट्ट पवारसाहेबांनी केला, असं तरी महामेट्रोनं सांगू नये, अशी टीका पाटलांनी केली आहे.

11 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. कंपनीला गॅरेंटी आणि इतर असा केंद्र सरकारने 8 हजार कोटी रुपयांचा वाटा त्यात उचलला आहे. 3 हजार कोटी रुपये महापालिकेने दिले. राज्य सरकारचा काही वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन होणार होते. कोविड परिस्थितीमुळे उशीरा कार्यक्रम घेऊ असं ठरलं होतं. पण शरद पवार यांना ट्रायल घेण्याची एवढी घाई कशासाठी झाली?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला 

नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती 

‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला 

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…