“महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात”

कोल्हापूर | जे जात्यात होते त्यांचे पीठ झाले आणि जे सुपात होते ते आता जात्यात जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो, असा सूचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जाते. मात्र सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार असून मी जे म्हणत गेलो तेच होत गेलं, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शिवसेना पदाधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ईडीला सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला 2 कोटी आणि  50 लाखांचं घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आलं.

यावर ईडी ही स्वायत्त संस्था आहे. कोणाच्या घरी काय सापडलं, त्यात काय आहे हे मला माहिती नाही. मात्र खूप काहीतरी होणार आहे असं दिसत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे हे भाग्यवान आहेत. त्यांची कुंडली बघायची आहे. कशाचे साेयरसूतक नाही. कोणी त्यांना अडवूच शकत नाही, कारण सगळ्यांची मजबुरी आहे. ठीक आहे, काही जणांचं भाग्य असतं पण प्रश्न तरी सुटले पाहिजेत. ते त्यांच्याकडून होत नसल्यानेच लोक एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे जातात, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव 

घर खरेदी करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुद्रांक शुल्क विभागाने घेतला मोठा निर्णय 

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा; विल स्मिथने सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली, पाहा व्हिडीओ