“अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला…”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील. तसेच विरोधकांचं काम आरोप-प्रत्यारोप करणं आणि जनतेला भरकटवणं आहे. तिकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला होता. आता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरुन आणि आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरेजींनी म्हटलंय की राज्यपालांना थेट भेटणं हे घटनेत बसत नाही. अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला लागतंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त एकदा पुण्यात आले आणि एकदा फोनवरुन उपलब्ध झाले. उद्धव ठाकरे फोनवरही उपलब्ध होत नाहीत.  त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला तरी फोनवर उपलब्ध होत नाहीत, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे थयथयाट होता. फ्रस्ट्रेशन व्यक्त करताना फोडेन, बाहेर पडेन, बघेन अशी भाषा वापरली जाते.

उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे दसरा मेळाव्यातील भाषणासारखंच होतं. आपल्या पक्षाचा ऱ्हास होतोय, आपलं चुकलंय या जाणिवेतून आलेले हे फ्रस्ट्रेशन आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नाना पटोले यांना कॉंग्रेसने अंडर ऑबाझर्वेशन ठेवावे.  शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी. ज्याची पत्नी पळून जाते त्याला मोदी म्हणतात असे म्हणणार्‍या नाना पटोलेंना नक्की काय म्हणायचंय, अशी टीका पाटलांनी केली आहे.

दरम्यान, विरोधक लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत आणि जनता जनर्दन मुख्यमंत्र्यासोबत आणि आमच्या सोबत ठाम उभे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

अर्थसंकल्पापूर्वी रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिले हे महत्वाचे सल्ले, म्हणाले 

वामिकाची पहिली झलक पाहून नेटकरी म्हणाले,’अरे हा तर दुसरा विराट’ 

“पटोलेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज, ते काँग्रेसला संपवल्याशिवाय राहणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; आजपासून ‘या’ गोष्टी पुन्हा सुरू होणार 

“ज्याची बायको पळून गेली, त्याचं नाव मोदी ठेवलं”