“राज्यात सत्ताबदल होणार, नवीन वर्षात भाजपचं सरकार येणार”

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीची जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.

त्यानंतर भाजपने वेळोवेळी राज्यात भाजपचं सरकार येणार, असं बोलून दाखवलं आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा भाजपचं सरकार येणार असल्याचं म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार आता काहीच दिवसांचे राहिले आहे. येणाऱ्या नवीन वर्षात राज्यात सत्ताबदल होईल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, याची कल्पना आहे. देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भविष्यात महाविकास आघाडी सरकार राज्यातून जाईल. त्यानंतर देशात आणि राज्यात भाजप सत्तेत असेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विश्वासघाताने गेलेले सरकार पुन्हा एकदा मेहनतीने आणता येईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत घेत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी भरण्यात आला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत अमोल महाडिक मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जे अपक्ष लोकप्रतिनिधी आहेत, ते देखील भाजप बरोबर येतील. कारण ज्यांना राजकीय भविष्य जाण आहे. महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही याची त्यांना कल्पना आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या या वक्तव्यावर आता महाविकास आघाडीचे नेते कोणती प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांसारखं चंद्रकांत पाटलांनीही केलं भरपावसात भाषण, पाहा व्हिडीओ

शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घट; वाचा कारण

मोठी बातमी! जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीकडून भाजपला दे धक्का

‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगणा राणावतला मोठा झटका, आता…

“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…”