पुणे महाराष्ट्र

अजित पवारांना पराभूत करणं म्हणजे निव्वळ आशावाद- चंद्रकांत पाटील

पुणे :  बारामतीत अजित पवारांनी केलेली कामं पाहता 2019 साली त्यांचा पराभव करणे निव्वळ आशावाद आहे, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. 

पिंपरी चिंचवडमध्ये मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. जे छापून आलं तसं काही मी बोललोच नव्हतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 

पिंपरी चिंचवडमध्ये आपण काय बोललो हे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा जोर देऊन सांगितलं. 

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?-

2019 ची बारामती लोकसभा आमचं टार्गेट नाही. 2024 ची बारामती लोकसभा आमचं टार्गेट आहे.  पुढं मी असंही वाक्य जोडलं की जे नॉर्मल राजकारणी उच्चारत नाहीत. मी वेगळ्या प्रकारचा राजकारणी आहे. त्यामुळे मी म्हणालो, की बारामतीत अजित पवारांनी केलेली कामं पाहता त्यांना 2019 ला पराभूत करणं आशावाद आहे. आमचं थोडंसं बारामतीत कमी काम झालं. मी आता दर आठवड्याला इथं यायचं ठरवलं आहे. लोकांची निवदनं घ्यायची, भाजपबद्दल त्यांच्यात विश्वास निर्माण करायचा आहे.- चंद्रकांत पाटील

पिंपरीत मी जे बोललो त्याच्या विपरीत छापलं, आजतरी करेक्ट छापा म्हणजे अजितदादांना जरा बरं वाटेल, असं सांगायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.

IMPIMP