पुणे महाराष्ट्र

तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटलांची दमदाटी

कोल्हापूर : राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तक्रार करणाऱ्या एका पूरग्रस्ताला झापलं असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरात पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना एका पूरग्रस्ताने चंद्रकांत पाटील यांना शेतीच्या सातबाऱ्यासंबंधी प्रश्न विचारला त्यावर त्यांनी ‘ए गप्प बस’ असं म्हणत त्याला खाली बसवलं. चंद्रकांत पाटीलांनी मदत मागणाऱ्या पूरग्रस्ताला गप्प केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

तुम्ही तक्रारी करु नका. सूचना करा. तक्रारी करुन काही होणार नाही, ए गप्प’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी पुरग्रस्ताला झापलं आहे. पुरात बुडालेल्या पुलाची शिरोली या गावात हा प्रकार घडला आहे.

चंद्रकांत पाटलांच्या या व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांच्या या वागणुकीमुळे सर्व स्तरावरुन संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

व्हिडीओमध्ये चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्तांशी संवाद साधत आहेत. शिरोळीमधून रोड सुरु झाला तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपणा सर्वांना प्रार्थना करेन की विचलित न होता, न घाबरता…सरकार पूर्णपेणे आपल्या पाठिशी आहे याची खात्री बाळगा, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

बिचारे चोवीस चोवीस तास झोपलेले नाहीत, याचवेळी लोकांमध्ये बसलेला एक पूरग्रस्त उभा राहून आपली व्यथा मांडू लागला. चंद्रकांत पाटील यावेळी त्याला सगळं करतो सांगतात.

काही दिवसांपूर्वीच पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी प्रकरणामुळे सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांचे आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे मदतीसाठी पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या पाकीटांवरचे फोटो आणि त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा चांगलंच वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुखने केली 25 लाखांची मदत

-अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेेदवारीसाठी भाजपकडून कँम्पेन

-“माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत पण मी देशभक्त आहे”

-काश्मीरला वाचवणं आपलं कर्तव्य आहे- दिग्विजय सिंह

-मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्रीने दुसऱ्या पतीविरोधात घेतली पोलिसात धाव

IMPIMP