…म्हणून गोपिचंद पडळकरांना विधान परिषदेचं तिकीट दिलं- चंद्रकांत पाटील

मुंबई |  भाजपमधल्या दिग्गज नेत्यांना डावलून पक्षाने गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ असलेले नाराज नेते देखील यावरून आश्चर्य व्यक्त करत आहेत. याच प्रश्नाचं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेला अजित पवार यांच्याविरोधात लढण्यासाठी उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षाने त्यांना बारामतीमधून लढण्यासाठी घोड्यावर बसवलं. त्यामुळे आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भाजपने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच या तिन्ही नेत्यांनी आपली खदखद प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. मात्र या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत पडळकर यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मिळवली.

दरम्यान, माझं तिकीट, माझा मतदारसंघ असं काहीच नसतं. सगळं पक्षाचं असतं. त्यामुळे एकाला न्याय द्यायचा म्हटल्यावर दुसऱ्यावर अन्याय होणं साहजिक आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-मध्यम, कुटीर, लघु उद्योगांसाठी निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

-प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

-“नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…”

-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका

-आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात