मुंबई | मराठा आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा आंदोलक पुन्हा एकदा तीव्र संतप्त झाले आहेत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये यावरुन मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा निर्णय दिल्यानंतर शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा पर्याय सुचवला होता. यावर शरद पवांरांकडून अशी अपेक्षा नव्हती. सलग 15 वर्ष तुमची राज्यात सत्ता होती तसेच ते गेली 50 वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल पाटील यांनी विचारलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती. जर होती तर तुम्ही आधीच ते द्यायला हवं होतं आणि आता भाजपने दिलेल्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, म्हणजेच हे मराठा समजाच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
मराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकारची काहीच भूमिका नव्हती. कारण केंद्र सरकार या प्रकरणात काही पक्ष नाही. हे आरक्षण टिकलं असतं पण राज्य सरकारने काय पूर्वतयारी केली होती?, कारण वकिलांमध्ये समन्वय नसल्यानं हे आरक्षण टिकलं नाही, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणावरुन मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा एकदा आंदोलन काढण्याची तयारी केल्याची माहिती आहे. सरकार आपलं आहे, मोर्चा किंवा आंदोलन काढण्याची गरज नाही, असं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील हे प्रकरण गांभीर्यानं घेतल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक होणार? फडणवीसांनी दिल उत्तर म्हणाले…
रिया आणि सुशांतचं ‘ते’ कृत्य व्हिडीओमधून आलं समोर; पाहा रिया आणि सुशांतचा अनसीन व्हिडीओ
सुशांत प्रकरणी रियाचा धक्कादायक खुलासा! ‘या’ व्यक्तीनं सुशांतला गां.जाची सवय लावली होती
दुचाकीला धडक देत तब्बल 4 वेळा कार हवेत उडाली अन् मग…; पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ