पुण्याला कोणी वाली राहिला नाही, या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

पुणे | विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी विधान परिषदेत पुुण्याचे प्रश्न न मांडल्याप्रकरणी पुण्याच्या नेत्यांवर टीका केली होती.

तसेच पुण्याचे प्रश्न न मांडले गेल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप करत ‘पुण्याला कुणीच वाली राहिला नाही’, असा टोला त्यांनी पुुण्याच्या भाजप नेत्यांना लावला आहे.

यावर भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडविण्यापासून कोणीच अडविले नव्हते, असे पाटील म्हणाले.

एकतर नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वत: चे अधिकार जास्त वापरतात. ते त्यांनी पुण्याच्या कामासाठी वापरायला अडचण नव्हती. खरे तर सभापतींनी सर्वांचे एकायचे असते. परंतु सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात, असे देखील पाटील म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA) देखील टीका केली. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. यावेळी त्यांनी काय केले, त्यांनी पुण्यासाठी काय केले, याची यादी द्यावी, असे पाटील म्हणाले.

राज्यात जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत, त्यावर देखील पाटील बोलले. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे त्याचा विचार करीत आहेत. पालकमंत्री नसल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. जिल्ह्यांना लवकरच पालकमंत्री नेमण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे रहाणार का? शशी थरुर म्हणाले…

“ईडीच्या भितीने राज ठाकरे भाजपसोबत जवळीक साधत आहेत, आणि…”; किशोरी पेडणेकरांची मोठी टीका

झारखंडचे मुख्यमंत्री आणि आमदार छत्तीसगढला अज्ञातस्थळी गेले; सांगितले ‘हे’ कारण

‘पोलीसांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा’; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

पुण्याच्या मानाच्या पाच गणपतींवरुन वाद; खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल