मुंबई | अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या, अशी धमकी आम्हाला शिवसेनेने दिली होती असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा जन्म आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील राजकीय घडामोडींवर विस्तृतपणे भाष्य केलं.
ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. राज्याचा निकाल त्रिशंकू लागला. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम राहिली. मात्र भाजपने आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, असं म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. या सगळ्यामुळे राज्यातली राजकीय समीकरणे बदलून महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले.
भाऊबीजेच्या दिवशी शिवसेना भाजपमध्ये एक बैठक होणार होती. मात्र त्याअगोदर पत्रकारांना बोलताना आमच्यात आणि शिवसेनेच्यात मुख्यमंत्रिपदाचं काहीच ठरलं नाही, असं देवेंद्रजी म्हणाले आणि त्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये बैठकच झाली नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेना-भाजपमध्ये एक बैठक पार पडली असती तर संघर्ष झाला नसता, अशी खंत व्यक्त करत सगळं काही आलबेल झालं असतं, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या-
-“शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा”
-कोरोबाबत पुण्यात अफवा पसरवण्यावर गुन्हा दाखल
“शरद पवारांनी तीन टर्ममध्ये 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या”
-मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त राम शिंदेंकडून झाली ही मोठी चूक
-“…तसं आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”