मुंबई | विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नाना पटोले बिनविरोध निवडून आले. कथोरे यांचा अर्ज का मागे घेतला? याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हाही अशी महाराष्ट्राची परंपरा आहे. कालपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक वादातीत असावी असं आवाहन केलं होतं. त्यामुळे आम्ही उमेदवारी मागे घेतली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
भाजप नेत्यांची आज बैठक झाली. महाराष्ट्राची चांगली परंपरा आहे की विधानसभा अध्यक्षांचं पद वादामध्ये आणायचं नाही. त्यामुळे महाराष्ट्राची ही परंपरा कायम रहावी यासाठी आम्ही कथोरेंचा अर्ज मागे घेतला, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, विधानभवनात 11 वाजता विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार होती. मात्र, नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा दिलासा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंच्या मातोश्री-2ची अशी असेल रचना – https://t.co/C9LYsTkkwh @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
पराभवानंतर पंकजा मुंडे म्हणतात, पुढे काय करायचं ते… – https://t.co/OI826E89VL @Pankajamunde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019
नितेश राणेंची महाविकास आघाडीवर बोचरी टीका! – https://t.co/rdOqvz1YNd @NiteshNRane @uddhavthackeray
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 1, 2019