जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जिल्हा सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला.
रोहिणी खडसे यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. मुक्ताईनगरमधील चांगदेव भागात रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.
शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुगलबंदी रंगली होती. त्यामुळे राजकीय डावपेचातून हा हल्ला झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
या हल्ल्यावरून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात असताना शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाटील या हल्ल्याची विधानसभेत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील करणार आहेत.
‘रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याने धक्का बसला. या हल्ल्यामुळे पावनभूमी असलेल्या मुक्ताईनगरच्या परंपरेला धक्का बसला आहे’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुक्ताईनगरात अनेक महिला ग्रामसेवक, तलाठी आहेत. महिला नगराध्यक्षा व मुख्याधिकारी देखील आहेत.
‘अशा मतदारसंघात पहिल्यांदाच महिलेवर हल्ल्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे’, अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
‘हा हल्ला कुणी केला? या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करावी व कठोर कारवाई करावी अशी मागणी मी आज विधानसभेत करणार आहे’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.
दरम्यान, रोहिणी खडसे मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या कारवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात रोहिणी खडसेंना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहितीही समोर आली.
महत्वाच्या बातम्या-
कामावर रूजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकार आक्रमक; केली ‘ही’ मोठी कारवाई
‘…तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा’; Omicron चं सुरुवातीचं लक्षण आलं समोर
मुंबईकरांना यंदाही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करता येणार नाही, पालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘माझ्यानंतर उद्धवला साथ द्या’; रामदास कदम यांच्या निरोपाच्या भाषणाची सगळीकडेच चर्चा
“…तर राज्य सरकार राज्यपालांविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकतं”