सध्या पोलिस यंत्रणेवर खूप ताण पडतोय… मला सुरक्षा नको- चंद्रकांत पाटील

मुंबई |  कोरोनाचं महाराष्ट्रावर सध्या भीषण संकट आहे. अशा परिस्थितीत जनतेसाठी सरकारने काही आदेश दिले आहेत. जनतेने आदेशाचं उल्लंघन करू नये यासाठी सध्या पोलिस दिवसरात्र मेहनत करत आहेत. पोलिसांवर याचा अधिक ताण आहे. अशा परिस्थितीत मला सध्या पोलिस सुरक्षा नको. मी पोलिस सुरक्षा सोडत आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून पोलिस सुरक्षा सोडत असल्याचं सांगितलं आहे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मी माझी पूर्ण सुरक्षा परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात मा.पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, देशात संचारबंदी लागू आहे.याचा पोलीस प्रशासनावर ताण पडत आहे.याचाच विचार करून मी निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याअगोदर भाजप नेते विनोद तावडे यांनीही पोलिस यंत्रणेवर खूप ताण असल्याचं सांगत सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची मागणी केली होती. यासंबंधी त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही- शिवाजी आढळराव पाटील

-संकटाच्या काळात असंवेदनशीलता दाखवू नका; आरोग्यमंत्र्यांचं खासगी डॉक्टरांना आवाहन

-कोरोनाच्या लढाईसाठी क्रिकेटच्या देवानेही केली 50 लाख रूपयांची मदत

-अजित पवारांचं सैन्य दलाला पत्र; लोकांनो आता तर घराबाहेर पडूच नका…!

-फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!