महाराष्ट्र मुंबई

प्रॉमिस तोडलं म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई |  विधान परिषद निवडणुकीवरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संधी न मिळाल्याने एकनाथ खडसे आणि मेधा कुलकर्णी यांनी पक्षाला काही सवाल केले. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कुलकर्णी यांना उत्तर दिलं आहे.

माझं तिकीट, माझा मतदारसंघ असं काही नसतं. दुर्देवाने भाजपमध्ये माझं तिकीट हा शब्द खूप विकसित झालाय. पार्टीने मेहनत करून पक्ष वाढवलेला असतो. त्यावेळी उपलब्ध असणाऱ्यांमध्ये तुम्ही चांगले असता म्हणून पक्ष तुम्हाला संधी देतो. तुमच्या जागी दुसरा व्यक्ती चांगला असेल तर पक्ष त्यांना संधी देतो, असं पाटील म्हणाले.

मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेचं आश्वासन देऊनही तिकीट का मिळालं नाही याबाबतची विचारणा केली. त्यावेळी पाटील यांनी न्याय आणि अन्यायाची व्याख्या सांगत कुलकर्णी यांना मेसेज देण्याचा प्रयत्न केला.

ज्यावेळी तुम्ही नाराज होता त्यावेळी काहीतरी करू, असं पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगितलं जातं. तसं करण्याचा तो एक प्रयत्न असतो. मात्र एकाला न्याय द्यायचा म्हटल्यावर दुसऱ्यावर अन्याय होतोच, असंही पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-“नाथाभाऊ, मुक्ताईनगरात नेऊन 2 थोबाडीत मारा, पण…”

-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता?; आंबेडकरांची टीका

-आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात

-२० लाख कोटी लिहायचं तर अर्थमंत्र्यांनी लिहिलं २० लाख, नंतर…

-‘…तर खडसेंचं निश्चित स्वागत करु’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर