महाराष्ट्र मुंबई

…तर काँग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 10-10 जागा मिळतील- चंद्रकांत पाटील

मुंबई |  मुंबईतल्या गोरेगावात भाजपच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन तर केलंच पण काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही.

भाजप शिवसेनेच्या युतीची घोषणा अजून व्हायची आहे पण त्याअगोदरच काँग्रेस राष्ट्रवादीने आपला धसका घेतलाय. अशा परिस्थितीत ते जर वेगवेगळे लढले तर त्यांना प्रत्येकी 10-10 जागा मिळतील, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर आपल्याला युती करायचीच आहे. पण कार्यकर्ते म्हणतात की आपली ताकद एवढी वाढली असताना युती करायची काय गरज?? पण मी कार्यकर्त्यांना सांगितलंय सध्याच्या परिस्थितीत युती होणे आवश्यक आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

भाजप आणि शिवसेना एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. दोघेही एकाच घरातील भावंडे आहेत. त्यामुळे काही मतभेद असतील तर चिंता करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे युतीचा आणि जागावाटपाबाबतचा निर्णय घेतील, असं पाटील म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपच्या प्रतिमेला तडा जाईल असं काम माझ्या हातून होणार नाही. बुथ रचनेचं महत्वाचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं म्हणूनच 2014 ला जिंकलो, लोकसभा जिंकलो आणि आता विधानसभाही जिंकू, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…अन् जे. पी. नड्डांच्या सुरात चंद्रकांत पाटलांनी सूर मिसळला

-काँग्रेसच्या अवस्थेवर रावसाहेब दानवेंचा विनोदी किस्सा… मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरेना!

“दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र घडवायचाय अन् विधानसभेवर भगवा फडकवायचाय”

-दुष्काळ, नापिकीला कंटाळून गावच काढलं विकायला; मायबाप सरकारनं लक्ष देण्याची गरज

-भाजप आज विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार; शिवसेनेला डिवचण्याचे प्रयत्न??

IMPIMP