“बास झाला त्रास, आता ठाकरे-पवारांना सांगणार आहे”

जळगाव | मुक्ताई मंदिरातील 5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचं काम केलं जात आहे, असा चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर केला आहे.

मी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झालं त्रास सहन करणं, असंही सेना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

मी देखील महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्याने माझ्यावर टीका करत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार चालू आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.

दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी निधीचा पाठपुरावा केल्याचं एक पत्र दाखवावं, आमदार खोटारडे आहेत, करंटे आहेत, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बायको, मेहुणा नाहीतर चहापेक्षा किटली गरम पीए मंत्र्यांना अडचणीत आणतात” 

गरिबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! 

IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव 

‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ 

  ‘कुणीही कायदा हातात घेतला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा