पुणे | राज्य सरकार चालवण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून भाजपकडून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या वेगळ्या हेल्पलाईनचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
मविआ सरकारने पीपीई किट, मास्क, व्हॅक्सिन अशा सर्व गोष्टी केंद्रानेच द्याव्यात अशी मागणी केली आहे. यावर भाष्य करत चंद्रकांत पाटलांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
पेट्रोल डिझेलवरील कर केंद्राने कमी केला तरी राज्य सरकार तो कमी करत नाही. त्यामुळे प्रत्येक जबाबदारी जर केंद्र सरकारनेच पार पाडायची असेल तर मविआ सरकारचे नेते फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहेत का? मग राज्य चालवायची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
बूथपातळीपासून भाजप पक्ष बळकट करत असून भाजप विरोधात तीन पक्ष वेगळे लढले किंवा एकत्र लढले तरीही निवडणुकीत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, असं त्यांनी सांगितलं.
नगरपंचायत निवडणुकीत पहिला क्रमांक मिळवून भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे, असंही पाटील यावेळी म्हणाले.
ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत असं भाजपचंही मत आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकार सभागृहाच्या कालमर्यादेबाबत घटनात्मक तरतुदींकडे दुर्लक्ष करून काम करत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत ठोस काहीही न करता या सरकारकडून फसवणूक चालू आहे, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्या ब्रा ची साईज देव…’; अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य
‘आज काळीज फाटलं’; आमदार विजय रहांगडालेंची लेकासाठी भावूक पोस्ट
‘या’ अभिनेत्रीने शॉवर घेतानाचा व्हिडीओ केला शेअर, सोशल मीडियात धुमाकूळ
सावधान! लस न घेतलेल्यांसाठी ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघ जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी