पुणे | माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
अनेकांना वाटतं मी कधी हिमालयात जातो. मी लक्ष देत नाही. कोल्हापुरात 40 हजारच मत पडली असती तर मला पाय ठेऊ दिला नसता पण तिथे कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केलं आणि यशापर्यंत पोहोचलो, असंही पाटील म्हणाले.
पवार असे म्हणाले होते की काँग्रेस मध्ये जाण्याऐवजी मी अंगाला राख फासून हिमालयात जाईल ते गेले नाही. मी म्हटलं होतं मी हरलो तर हिमालयात जाईल. मग ते गेले नाही, माझ्या जाण्याचा प्रश्नच नाही, असंही पाटील म्हणाले.
किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, पुण्यात किमान 200 ठिकाणी निदर्शने व्हायला हवी होती पण पुण्यातील पदाधिकाऱ्यांना महापालिकेशिवाय भाजप माहीतच नाही. आपण केवळ नगरसेवक म्हणून केवळ काम करण्यासाठी जन्माला आलो नाही आपण राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
पुणे महापालिका निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकतील पण राजकारणात एका रात्रीत काहीही होऊ शकतं, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, यावेळी त्यांनी मनसेसोबत युतीची चर्चा फेटाळून लावली. राज ठाकरे भविष्यातील मित्र असतील अशी आता काही शक्यता नाही. त्यांच्यासोबत युतीचा चा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणी घेतील, असं ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे
…म्हणून लोक भाजपला मतदान करतात- पृथ्वीराज चव्हाण
“तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी?, बाबरी पडली तेव्हा तर तुम्ही बिळात लपला होतात”
“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”
मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!