Top news महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊतांना जगावर बोलण्याचा अधिकार, त्यांना सर्व जगाचं कळतंय”

sanjay raut 2 e1637068345791
Photo Courtesy - Twitter/@LalanKumarINC

मुंबई | देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक (Election) आयोगाने जाहीर केलाय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे.

गोवा (Goa) आणि उत्तर प्रदेशमध्ये (Uattar Pradesh) शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

गोवा आणि अन्य राज्यात शिवसेना निवडणूक लढणार का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ‘नक्कीच आमचा गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे, असं संजय राऊत म्हणालेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

पाच राज्याच्या निवडणुका या निवडणूक आयोग ठरवतो, संजय राऊताना साऱ्या जगाच्या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे, मात्र अलीकडे त्यांना कुणी सिरीयस घेत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

आगामी निवडणुकातही शिवसेनाही उतरणार आहे, त्यावरून त्यांनी शिवसेनालाही जोरदार टोला लगावला आहे. सेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी दरवेळेस डिपॉझिट घालण्यासाठी पैसे मिळतात, त्यामुळे ते डिपॉझिट घालवतात, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी संविधान मानत नसले तरी आम्ही मानतो, विरोधकांना त्यांच्या सोयीनुसार झालं की मग योग्य वाटतं असेही ते म्हणाले तसेच संजय राऊत यांना सर्व जगाचं कळतंय, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

दरम्यान, तर ‘निवडणूक आयोगाने काही बंधन घातली आहेत. ती सगळ्यांसाठी असावीत. आम्ही पश्चिम बंगालमध्ये पाहिलं की दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाही त्या लाटेवर आरुढ होऊन कसा प्रचार केला. विशेषता पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मोठ्या नेत्यांनी मोठ्या सभा, रॅली घ्यायला नको, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

पंतप्रधानांनी तर आदर्श घालून दिला पाहिजे. नियमांचं पालन केलं पाहिजे. पंजाबमधील घटनेनंतर आम्हाला त्यांची चिंता वाटते. तर कोरोनामुळे लोकांची चिंता वाटते, असा टोलाही राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी! 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार