पुणे महाराष्ट्र

भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करा; उगीच सहानभूती मिळवू नका- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर |  भाजपा सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे. मुख्यमंत्री स्वत: आमच्या आमदारांना फोन करून भाजपात प्रवेश करण्याचा तगादा लावत आहेत, असं शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

शरद पवार साहेबांनी भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करावा; उगीच सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असं पाटील म्हणाले आहेत.

कोल्हापूरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित विविध पक्षांच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश होत आहे. चंदगडचे माजी आमदार भरमुआण्णा पाटील हे देखील भाजपात प्रवेश करत आहेत.

तुम्ही वर्षानुवर्षे घराणेशाही जोपासली. बारामती लढवायला मुलगी लागते… मावळ लढायला नातू लागतो… तुम्हाला कुणालाही पुढे येऊच द्यायचं नाही, असा घणाघात पाटील यांनी केला.

लोकांना पर्याय नव्हते म्हणून ते तुमच्यासोबत राहिले पण आता त्यांना पर्याय मिळतोय. कामाचा झंझावात ते पाहत आहेत. म्हणून ते आमच्याकडे येत आहेत, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून विविध चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लावण्याची धमकी विरोधी पक्षातल्या नेत्यांना मिळत आहे, असा गंभीर आरोप शनिवारी पुण्यात पवारांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ”

-साथ सोडलेल्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी आखली ‘ही’ मोठी रणनीती!

-राजीनामा देण्याअगोदर चित्रा वाघ माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या….- शरद पवार

-‘हे’ पाच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीसोबतच; शरद पवारांचा दावा

-गद्दारीने परतफेड करण्याचा इतिहास आलाय- जितेंद्र आव्हाड

IMPIMP