“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”

मुंबई | राज्यात सध्या परीक्षा घोटाळे गाजत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यावरून आक्रमक झालेत. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोनं सापडलं.

म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. असं ट्विट करत फडणवीसांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अशात आता या प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने महाराष्ट्र पोलीस याचा तपास करू शकणार नाही. म्हणून आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

भाजप कोणालाही पाठीशी घालणार नाही. यामध्ये आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पाटलांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गेंड्याच्या कातडीपेक्षाही असंवेदनशील सरकार झालेलं आहे. परीक्षांमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मुळात तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नाही. तुम्हा गोळाबेरीज करुन सरकारमध्ये आला आहात. या सर्वांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

अधिकार जसे हवे असतात तसेच समस्याही तुमच्या अंगावर घ्यायला हव्यात. पैसे देऊन परीक्षा होणार असतील तर त्यातून काय निर्माण करणार आहोत आगामी काळात, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

सभागृहामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देता येत नाही असं सांगितलं. मग त्या तिजोरीचं करायचं काय? नाही दे जा असं म्हणून चालत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या –

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर 

अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर 

भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’ 

“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा 

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…