“खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी….”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ आपल्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहेत? उद्धवजी, कधीतरी बंड करून उठा, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महाराष्ट्राची काही अस्मिता आहे. बाळासाहेबांचा वारसा शिल्लक ठेवायचा आहे की नाही? की ते संग्रहालयात ठेवायचे आहेत?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.

नवाब मलिकांचा मुंबईतल्या बॉम्बस्फोटात सहभागी गुन्हेगारांशी असलेला संबंध याविषयी त्यांना अटक करून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. सुरुवातीला त्यांची खाती काढून घ्यायला मुख्यमंत्री तयार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

न्यायालयाने दाऊदशी संबंध असल्याच्या दाव्यात तथ्य असल्याचं म्हटल्यानंतरही नवाब मलिकांचा राजीनामा उद्धव ठाकरे घेणार नसतील, तर महाराष्ट्राची इतर कोणत्या राज्याशी तुलना करणं ही त्या राज्यावर अन्याय होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कुणीतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, तर त्यावर तातडीने 15-16 जिल्ह्यात केसेस दाखल होतात. अटक होते. जामीन मिळू दिला जात नाही. मग ज्यांचा हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी संबंध असल्याचं न्यायालयाने म्हटल्यानंतरही राजीनामा घेणार नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित शिवसेना आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले… 

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार 

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगी