“उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यावा”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते अद्याप समोर आलेले नाहीत. दरम्यान, काल ते वर्षा निवासस्थानी आल्याची माहिती मिळतेय. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज देण्याची मागणी केली आहे.

आरोग्याच्या कारणावरुन राज्यावर अन्याय करु नका. 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा तीन पक्षांचं सरकार आहे. हवं तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा. आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची फाईल 5 तास पडून होती. असा व्यक्तींवर ही वेळ येत असेल तर इतरांचं काय. त्यामुळे महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रत्यक्षपणे सहभागी नव्हते. मात्र त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या चहापानाच्या कार्यकर्मावर विरोधकांनी मात्र बहिष्कार घातला.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार टीका टीप्प्णी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपला चांगलाच चिमटा काढला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार घालत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

चहापानावर यापूर्वी सातत्याने बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. प्रत्येक वेळी काही ना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा हे घडायला नको. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना पत्र लिहून निमंत्रण दिलं होतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ते कुठला ना कुठला मुद्दा काढून बहिष्कार टाकतात, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मद्यावरील टॅक्स कमी का केला?, अजित पवारांनी सांगितलं खरं कारण 

विधान परिषद निवडणुकीदरम्यानचा गोंधळ दिल्ली दरबारी; ‘या’ 3 काँग्रेस नेत्यांना हायकमांडने झापलं 

“ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं” 

पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई, बड्या भाजप नेत्याला अटक झाल्याने खळबळ 

“संप मागे घेतला नाहीतर मी स्वत: एसटी चालवत सेवा सुरू करणार”