मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत काँग्रेसशिवाय कोणताही फ्रंट अस्तित्वात येऊच शकत नसल्याचं म्हटलं आहे.
राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या भेटीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.
शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.
दरम्यान, नवी आघाडी झाली तरी काँग्रेसच्या नेतृत्वातही एखादी आघाडी काम करेलच. काँग्रेससोबत अनेक पक्ष आहेत. ते काँग्रेसच्या नेतृत्वात जातील. त्यामुळे तीन तीन फ्रंट हवेत कशाला? काय करणार एवढे फ्रंट करून? अशाने भाजपला आपण पर्याय देऊ शकणार नाही, असं राऊत यांनी सांगितलं.
विरोधकांची एक बैठक बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामी तुम्ही पुढाकार घ्यावा अशी विनंती मी राहुल गांधींना केली आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड
“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार”
लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर
Omicron च्या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा