“आमच्या जीवावर खासदार निवडून आणाऱ्यांनी देशाच्या राजकाराची स्वप्न बघू नये”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लगावला आहे.

फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली. यावेळी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, अनुप शहा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जाना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना मारला आहे.

सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनचं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर भारतात Corona ची भयंकर तिसरी लाट येणार” 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Royal Enfield ची धमाकेदार बाईक लाँच; 2 मिनिटांत लागला SOLD OUT चा बोर्ड 

“Christmas दिवशी असं काही घडणार की संपूर्ण जग हादरणार” 

लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर