“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?”

मुंबई | त्रिपुरातील कथित घटनेवरून गेले दोन दिवस महाराष्ट्र धुमसून निघाला. मालेगाव आणि अमरावतीमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. याता या हिंसाचारावरून राजकारणही पेटले आहे. या दोन्ही ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. या घटनेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

1993 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता. आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार नाहीत का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. ते अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

भाजप हे सॉफ्ट टार्गेट होतं. काही झालं की भाजपचा हात आहे असं बोललं जातं. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे ही संजय राऊत यांनी सांगून टाकावं. कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती. ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

याआधी या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्यातील सर्वच मुसलमान वाईट आहेत असं नाही. 95 टक्के मुस्लिम प्रामाणिक आहेत. तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून दंगल माजवून थेट पोलिसांना लक्ष्य करणाऱ्या 18 संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एकूण 41 जणांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मालेगावमध्ये पुकारलेल्या बंदमध्ये तब्बल पाचशे जणांचा जमाव अचानक आक्रमक बनला. त्यातील काही जणांनी जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर हैदोस घातला. हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांची वाहने फोडली.

अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशयितांनी प्रचंड दगडफेक केली.

जवळपास अडीच तास ही अराजकसृश्य परिस्थिती होती. त्यात जणांनी थेट पोलीस उपअधीक्षक दोंदे यांच्या सुरक्षारक्षकावर कटरने हल्ला केला. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. आता पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे.

मालेगाव पेटल्याने त्याचे पडसाद इतर ठिकाणी उमटले. त्यामुळे येथील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.  पोलिसांची अतिरिक्त कुमत मागवण्यात

महत्त्वाच्या बातम्या-

“गाईचं शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि …” 

मोठी बातमी! मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना आलेल्या निनावी फोनमुळे खळबळ, दिली ही धमकी 

“कोरोना काळात मुख्यमंत्री पैसे मोजण्यात व्यस्त म्हणून मानेचा त्रास” 

 “95 टक्के मुस्लिम प्रामाणिक तर 5 टक्के मुस्लिम गडबड करतात”

कोम्बिंग ऑपरेशनला मोठं यश! नक्षलवाद्यांच्या ‘हा’ मोठा नेता ठार झाल्याची माहिती