मुंबई | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये चालू आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार जुगलबंदी रंगली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर एसटी महामंडळाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.
राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असणारी लालपरी गेल्या दोन महिन्यांपासून संपाच्या गर्तेत अडकली आहे. परिणामी राज्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वेतनातील अनियमीतता या मुद्द्याला सरकारच्या वतीनं निकाली काढण्यात आलं आहे. पण संपकरी कर्मचारी आपल्या एसटी विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीवर ठाम आहेत. पण हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ठ असल्यानं सरकार यामध्ये काहीच करू शकत नाही.
न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणं आम्ही कारवाई करण्यासाठी बांधिल आहोत, असं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. तर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एसटीबाबतच्या एका वक्तव्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
एसटीचं विलिनीकरण आमचंच काय कोणतही सरकार आलं तरी शक्य नाही, असं वक्तव्य अधिवेशनात एसटी कामगारांच्या मुद्द्यावर चर्चा करताना अजित पवार यांनी केल्यानं सध्या त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
अजित पवार यांच्या परखडपणाचा अभिमान आहे पण त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण डोक्यातून काढून टाका, असं धुडकावल्यासारखं सांगू नये, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
विलिनीकरण का शक्य नाही हे समजाऊन सांगा, जीवन प्राधिकरणाचे विलिनीकरण केलं तर महामंडळाचे का शक्य नाही, हे पण समजाऊन सांगावं. एसटी कर्मचाऱ्यांना दरडावून नाही तर समजाऊन सांगा, असंही पाटील म्हणाले आहेत.
सरकारी नोकरदारांच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं सोई आणि सुविधा देण्याचा विचार करावा. परिणामी कर्माचाऱ्यांनादेखील समाधान वाटेल, असंही पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं सरकारचं कोट्यावधीचं नुकसान होत आहे. इतकच नाही तर ग्रामीण भागात शाळेसाठी ये-जा करणाऱ्या सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या-
मला तर वाटतं मरावं आणि त्या राणी बागेतल्या…- सुधीर मुनगंटीवार
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर
अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर