भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते- चंद्रकांत पाटील

पुणे |  ईड ही स्वायत्त संस्था असून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे. यावरच चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रियी दिली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.यावेळी खासदार गिरीश बापट, अमर साबळे, महापौर मुक्ता टिळक, कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे उपस्थित होते.

पोलिसांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वसतिगृह बांधून देण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत़ हा निधी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दिला जाणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

रुग्णांचे कपडे, बेडशीट धुवण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी एक कोटी ३० लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-