“मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं”

मुंबई | राज्यातील सत्तातराबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

पनवेलमध्ये भाजप कार्यकारणीची बैठक सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरही उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं, असंही ते म्हणाले

अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला, असं त्यांनी सांगितलं.

या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या अनेक नेत्यांच्या मनात मुख्यमंत्रीपदावरून अजूनही खदखद कायम असल्याचं दिसून येत आहे.

तसेच शपथविधी झाल्यानंतर आता 21 दिवस उलटत असतानाही भाजपच्या नेत्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा मृत्यू 

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रकरणांचे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढले 

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण 

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये” 

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”