“गुप्त मतदान घ्या, दूध का दूध पानी का पानी होईल”

मुंबई : महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाची भीती वाटत आहे. अनेक आमदारांना कोंडून ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे गुप्त मतदान घ्या, दूध का दूध पानी का पानी होईल,  असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा आहे. उद्धव ठाकरे सध्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत आणि तरीदेखील त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत सभागृहाचे सदस्य नसले तरी शपथ घेण्याची मुभा ही मंत्र्यांसाठी आहे मुख्यमंत्र्यासाठी नाही. त्यामुळे सरकारला नियमाबाहेर काम करु देणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. विधानसभेत आज दुपारी 2 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीकडे 170 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-