“विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, ती वेळ…”

कोल्हापूर | देशात आगामी काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता असेल. तसेच विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं. ती वेळ काही दिवसांची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विधान परिषदेसाठी 6 ठिकाणी 10 तारखेला निवडणूक होत आहे. महाडिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. महाडिक यांचाच विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सहा वर्षांपू्र्वीची आणि आताची परिस्थिती यात फरक आहे. आवडे आणि कोरे मागच्यावेळी आमच्यासोबत नव्हते. आता ते आमच्यासोबत आहेत. या निवडणुकीतच नाही तर जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आमच्यासोबत आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

नवीन तयार झालेल्या नगरपालिकांमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. 105 भाजप तर कोरे आणि आवडे यांचे मिळून 165 सदस्य होतात. बाकीची जुळवाजुळव सोपी आहे. कमी पडणारी 43 मतं यायला काही अडचण येणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अमल महाडिक यांना कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपाकडून तिकीट देण्यात आले आहे. महाडिक हे उच्चशिक्षीत उमेदवार असून, त्यांनी ‘एमएससी’पर्यंत शिक्षण घेतलं आहे. महाडिक हे जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत.

शिरोली मतदारसंघातून ते काँग्रेसमधून विजयी झाले होते. पंरतु काँग्रेसचे सध्याचे उमेदवार सतेज पाटील यांच्यासोबत असलेल्या वादामुळे त्यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी हुकली.

2014 साली अमल महाडिक यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री असलेल्या सतेज पाटील यांचा अनपेक्षित पराभव केला, आणि ते आमदार झाले.

2019 साली त्यांना भाजपकडून पुन्हा एकदा विधानसभेचे तिकीट देण्यात आलं. मात्र यावेळी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

दरम्यान,अमल माहडिक आज उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि मित्रपक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मोदीसाहेब ज्यांना अशापद्धतीने भेटले ते पुन्हा सत्तेत आले नाहीत” 

“नरेंद्र मोदी सर्वात मोठे नौटंकीबाज, ते चुकून राजकारणात आलेत” 

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘फोटोबॉम्ब’; वानखेडेंचं टेंशन वाढलं

पुण्यनगरीचे महापौर पुन्हा चर्चेत! ‘हा’ बहुमान मिळवणारे देशातील पहिले महापौर

 “चार दलितांना मंत्रिपदं देणं हा तर काॅंग्रेसचा दिखाऊपणा आणि भंपकपणा आहे”