‘…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते”

मुंबई | दोनदा पत्र देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नाही. असं करत त्यांनी राज्यपालांचा किंबहूना घटनेचा अपमान केला आहे. या मुद्द्यावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, असं भाजप (Bjp)प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील( Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचं हे तेच ठरवतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यपालांच्या (Governor Bhagatsingh Koshyari) अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात, असं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

सरकार कृत्रिम रित्या तयार झाल्यानंतर ते कसं वापरायचं हे त्यांच्या हातात आहे. नारायण राणे यांना अटक केली काय झालं पुढे. कोर्टाने त्यांना फटकारलं. आता त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे ते पुढे काय करतील हे सांगता येत नाही. मात्र आमचा कोर्टावर विश्वास आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार हा प्रश्न आहे. वर्षभरापासून निवडणुका पेंडिग आहेत. सहा निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे रद्द झाल्या. सगळे गोंधळ राज्य सरकार करतंय, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला.

यावर सर्व कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

नितेश राणे अज्ञातवासात?, नारायण राणे म्हणतात… 

“…नाहीतर शशी थरूर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल” 

‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं वादग्रस्त वक्तव्य 

विषारी साप मला तीन वेळा चावला, सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं- सलमान खान 

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध!