“बरंच काही शरद पवारसाहेबांकडून शिकण्यासारखं आहे”

मुंबई | शरद पवार यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, त्याना जे करायचं असतं ते करतात, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी बोलताना पवारांचं कौतुक केलं.

माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आणि त्यांनी चमत्कार घडवला’ ही शरद पवारांची प्रतिक्रिया बोलकी असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यांनी या संदर्भात ट्विटही केलंय.

प्रतिस्पर्ध्यांच्या यशाचं मनमोकळं कौतुक करणं आणि आणखीही बरंच काही पवारसाहेबांकडून खरोखरच शिकण्यासारखं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजप तिसरी जागा जिंकणारच होती. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला की, हा हट्ट करू नका. गेल्या 24 वर्षात महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत. आमच्याकडे भाजपची 30 मते आहेत, त्यामुळे तुम्ही कशासाठी हट्ट धरता. विधान परिषदेला पाचवी जागा जिंकता येते तरीसुद्धा बिनविरोध होऊ, असंही आम्ही सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ 

चक्क शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले… 

Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया