नाथाभाऊंविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार- चंद्रकांत पाटील

जळगाव | मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर  बेकायदेशीर कर्ज दिलं जात असल्याचा आरोप केला आहे. जळगावच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुक्ताईनगरच्या साखर कारखान्याला एवढं कर्ज मंजुर कसं होतं. खाजगी बँकेला कर्ज मंजुर केलं जात आहे. मात्र मधुकर साखर कारखान्याला थकहमी दिली जात नाही, शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नाही. मग मुक्ताई साखर कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिलं जात आहे. त्यांमुळे हे कर्ज बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

मुक्ताई साखर कारखाना एकनाख खडसे आणि शिवाजी जाधव यांनी खरेदी केला आहे. हा कारखाना 49 कोटी रूपयांना खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना 51 कोटी कर्ज देण्यात आलं. त्यानंतर 55 कोटी मालतारण कर्ज देण्यात आलं. त्यानंतर आता पुन्हा 8 कोटी रूपयांचं कर्ज देण्यात आलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांनी माझं विधानसभेचे तिकीट कापल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सध्या भाजपमधील अंतर्गत वाद समोर यायला लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-